पुणे-नगर रोड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मेजर तुकाराम डफळ

शिरूर तालुका

मांडवगण फराटा (संपत कारकुड): माजी सैनिकांच्या अनेक समस्या आहेत. सरकारी कामामध्ये सैनिकांना मान-सन्मान मिळत नसून रिटायर होऊन आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं परंतु सैनिकांच्या अडचणी कोणीच समजून घेत नाहीत. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मेजर तुकाराम डफळ यांनी केले.

पुणे-नगर रोड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नुकतीच माजी सैनिक तुकाराम डफळ यांची निवड करण्यात आली यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना डफळ म्हणाले, सध्या नागरीकांचा आरोग्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा असून “हेल्थ इज वेल्थ” यावर विषयावर जास्त काम करण्याची गरज आहे. पैसे देऊन जे मिळत नाही, ते समाजसेवा करुन मिळत आहे. याच प्रेरणेमुळे आपण समाजासाठी यापुढेही काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे-नगर रोटरी क्लबच्या वतीने वाघोली येथे २० व्या पदभार समारंभामध्ये डफळ यांच्याकडे नुकतीच या पदाची सुत्रे देण्यात आली आहेत.

भारतीय सेनेत अठरा वर्षाची सैनिकी सेवा पूर्ण केल्यानंतर डफळ गेली चार वर्षांपासून सामाजिक काम करत असुन विशेष म्हणजे माजी सैनिकांच्या समस्यांसाठी ते रात्रंदिवस काम करत असून त्यांनी आजी-माजी सैनिकांच्या अनेक अडचणी दूर केल्या आहेत. करोना काळात पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून शिरूर तालुक्यातील काही माजी सैनिकांनी बंदोबस्ताचे काम केले होते. त्यामध्ये डफळ यांचाही सहभाग होता. या कामाची दखल घेऊन त्यांना हे पद दिले आहे.

त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी सैनिक सैनिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून रोटरी क्लबवर प्रथमच एका माजी सैनिकाला अध्यक्षपद देण्यात आले आहे. नवीन कार्यकारणीमध्ये सचिवपदी माला देवी यांची निवड झाली असून कार्यक्रमास राजेंद्र दणके, कॅप्टन बोराडे, बाळासाहेब गवारे, सुनील गवारे, संपत दिघे, बापूसाहेब काळे, अंकुश शिंदे, नवनाथ निचित, बापू निचित, सदाआण्णा पवार, राजेंद्र दणके, अंकुश शिंदे, हेमलता डफळ, पत्रकार साकोरे, सुभेदार खंडारे, राम उचाळे, शिवाजी कुंदाडे आदी उपस्थित होते.