शिरुरमधील सराईत सोनसाखळी चोर साताऱ्यातून घेतला ताब्यात

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात (दि ३०) डिसेंबर रोजी ८:४० वाजल्याच्या सुमारास भरदिवसा चैन स्नॅचींगचा प्रकार घडला होता. यातील आरोपीस शिरुर पोलिसांनी जंग जंग पछाडत सातारा येथून मोठया सीताफीने अटक केली असुन त्यास न्यायालयात हजर केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिरुर नवीन नगरपालिका, कोंडे हॉस्पीटल समोरील रोडवर आशा मारुती गरगटे (वय ६७) रा. मंगलमुर्ती नगर जलसा हॉटेल मागे, शिरुर ह्या पायी जात असताना एक अज्ञाताने काळया रंगाचे पल्सर मोटारसायकलवरुन येऊन त्यांच्या गळयातील मिनीगंठण कि.रु. ६०,०००/- रु .चा माल ओढुन तोडुन बळजबरीने चोरुन नेला होता. त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा तपासाकामी शिरुर पोलिसांनी शिरुर ते चंदनगर असा CCTV फुटेज व मोबाईल तांत्रीक विशेषण याद्वारे सतत प्रयत्न करुन आरोपीची पल्सर मोटार सायकलचा प्रथम शोध लावला. त्या मदतीने तसेच CCTV फुटेजच्या आधारे आरोपी हादीहसन सर्फराज इराणी (वय २३) रा. पाटकर प्लॉट नं ०८ महात्मा गांधी वसन, शिवाजीनगर ,पुणे यास निष्पन्न केला. आरोपी हा रेकार्डवरील सराईत असल्याने तो सतत त्याचे ठावठिकाणा बदलत होता. त्याच्याबाबत खात्रीशीर बातमी काढुन त्यास सापळा रचुन सातारा येथुन ताब्यात घेउन त्यास सदर गुन्हयाचे कामी (दि. २) फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे.

आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास केला असता त्याने गुन्हयातील गेलेला माल गळयातील मिनीगंठण कि.रु. ६०,०००/- रु चा माल काढुन दिलेला असल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे. त्याचे कडे शिरुर परीसरात व इतर ठिकाणी झालेल्या चैन स्नॅचींग चोरी मध्ये त्याचा सहभाग आहे काय याबाबत पोलीस अधीक तपास करीत आहेत.

ही कार्यवाही पुणे ग्रामिण चे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गटटे, पुणे व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस नाईक एकनाथ पाटील, पोलिस हवालदार नितीन सुद्रिक, पोलिस नाईक नाथा जगताप, पोलिस नाईक विनोद मोरे, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात व पवन तायडे यांच्या पथकाने केली आहे.