शिरुर येथे मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महिलांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जालना येथे मराठा बांधव मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरु केले असुन त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिरुर येथील महिला तहसील कार्यालयाच्या आवारात उद्या मंगळवार (दि 12) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

 

याबाबत महिलांच्या वतीने शिरुर पोलिस स्टेशन आणि शिरुर तहसील कार्यालयात राणी कर्डीले, श्रुतिका झांबरे, शशिकला काळे, राधिका घाटगे, सुवर्णा सोनवणे, वैशाली गायकवाड, कल्पना पुंडे यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात 1) मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. 2) संपुर्ण मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच 3) आजवर मराठा समाजाची जेवढी आंदोलने आणि मोर्चे झाले. त्यातील मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशा मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.