शिक्रापूर (शेरखान शेख): पोलिसांना कोणतेच सन उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो, प्रत्येक वेळी कोणत्याही सन उत्सव वेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होत त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते. मात्र शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये बसवलेल्या गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करत गानेशोत्सवाचा आनंद घेतला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे सर्व पोलिसांच्या वतीने गणेशोत्सव साजरा करत गणपती बसवण्यात आलेला होता. त्यानंतर दररोज पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्या हस्ते आरती करत गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आता सर्वत्र गणेश विसर्जन कार्यक्रम सुरु होणार असल्याने पोलिसांना बंदोबस्तावर हजर रहावे लागणार असताना पोलीस स्टेशनच्या सर्व पोलिसांनी उपस्थित राहत सर्वांनी फेटे बांधत गणपतीची पारंपारीक वाद्यच्या तालात मिरवणूक काढत मोठ्या जल्लोषात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, नितीन अतकरे, वैभव पवार, वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांसह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच महिला कर्मचारी सहभागी झाले होते.
दरम्यान अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीमध्ये नाचण्याचा आनंद घेतला तर सर्व पोलिसांना फेटे बांधलेले असल्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक निघाल्याने या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, तर यावेळी बोलताना कोणताही सन उत्सवाचा आनंद आम्हाला घेता येत नसतो मात्र गणेशोत्सवाचा आनंद साजरा करता येत असल्याचे समाधान आम्हाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.