आमदार अशोक पवारांकडून मुद्दे सोडून टीका: आबासाहेब सोनवणे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): आमदार अशोक पवार यांच्याकडे मुद्दे नसून आमच्या पॅनलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता आमदार वैयक्तिक पातळीवर टिका करु लागले असून त्यांच्याकडे मुद्दे नसल्याने ते वैयक्तिक विषयावर येत असून त्यांनी मुद्दे सोडून टीका न करता त्यांचा व्यवसाय देखील जाहीर करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पार्टीचे शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, किसान क्रांती मोर्चा तालुकाध्यक्ष काकासाहेब खळदकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे, वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार, सोसायटीचे संचालक कैलास फराटे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना घोडगंगा किसान क्रांती पॅनल ध्यैय धोरणावर कारखान्याची निवडणूक लढत असताना कारखान्याचे मुद्दे पुढे येणे गरजेचे असताना आमदारांकडून वैयक्तिक टिका होत आहे. आमदार पुनर्वसन या विषयावर बोलत आहेत. मात्र पुनर्वसनच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमदार अशोक पवार यांच्या बगल बच्चानी पुनर्वसनच्या जमिनी खरेदी केल्या आहेत.

जिल्हा पुनर्वसन मध्ये दोन विषय गाजले त्यातील कोरेगाव भिमा येथील एक जागा त्यांच्या हस्तकाला कशी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. यापूर्वी कारखान्याच्या सभेत गोंधळ झाला तेव्हा मी तालुकाध्यक्ष नात्याने नागरिकांना शांत केले त्यामुळे मी सभासद नसताना कसा काय बोललो असे म्हणतात मग त्यांचे कार्यकर्ते असलेले राजेंद्र नरवडे व आदी लोक केव्हा सभासद झाले हे सांगावे, यापुढे जेथे जेथे सभासदावर अन्याय होईल तेथे आम्ही जाणारच, येथून पुढे आमचा विरोध प्रखर राहिल.

तुम्हाला मला सल्ला देण्याचा अधिकार नाही, आपल्या स्वतःच्या गावातील संस्था तरी आपल्या ताब्यात आहेत का, जेव्हा अशोक पवार आमदार असतात तेव्हा वडगाव रासाई मधील गुन्ह्यांची संख्या तपासावी, निवडणूक कारखान्याची आहे तुम्ही कारखान्याच्या मुद्द्यावर वर बोला, निवडणूक कशाची चालली हे ओळखून तुम्ही बाहणावर या आणि बोलताना विचार करुन बोला, आम्ही आपल्या पदाचा आदर करतो म्हणजे आम्ही घाबरतो असे नाही. जेथे त्यांची सभा असेल तेथे वारदार सभासद यांचे काय अशा प्रश्न आमदारांना विचारला जात आहे.

आमदार मी दिवसभर जनतेची सेवा करतो, त्यांच्या पत्नी जनतेची सेवा करतात असे सांगत असताना आता त्यांचा मुलगा देखील समाज कारणात आलेला आहे. त्यामुळे सर्वच जन समाजसेवा करत असताना त्यांचा व्यवसाय तरी काय त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन देखील आबासाहेब सोनवणे यांनी केले आहे.

घोडगंगा निवडणूकीत पैलवान मंडळी ‘त्यांना’ योग्य जागा दाखवतील: रामभाऊ सासवडे

घोडगंगाच्या कामगारांचे हक्काचे पैसे द्या, त्यांचा तळतळाट घेऊ नका: सुधीर फराटे

आमच्यावर टिका करता तर तुम्ही स्वतःला आणि मुलाला उमेदवारी का घेतली?: दादा पाटील फराटे

Video: घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही: महेश ढमढेरे

घोडगंगात भ्रष्टाचार करुन अशोक पवारांनी व्यंकटेश उभारला: अ‍ॅड सुरेश पलांडे

Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे

खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे