कान्हूर मेसाई विद्याधामच्या NMMS परीक्षेत तब्बल 15 विद्यार्थांना घवघवीत यश

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा राखत नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयातील 15 विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी झाली असल्याने त्यांना 12 वी पर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याने प्रत्येक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याला एकूण 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती प्राचार्य अनिल शिंदे यांनी दिली आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विदयार्थ्यांपैकी अथर्व लक्ष्मण ननवरे १३० गुण, सुजित सहादू थोपटे १२६ गुण, ईश्वर संजय पिंगळे १२५ गुण, सार्थक दीपक तळोले १२४ गुण, सार्थक अर्जुन खैरे ११७ गुण, कुणाल बाळशीराम ११७ भोर, तनुजा संतोष पुंडे ११६, साक्षी बाळू नरवडे ११६ गुण, अतिष नितीन बोऱ्हाडे ११४ गुण, संकुल धनंजय डफळ ११३ गुण, उत्कर्ष अशोक सातपुते ११३ गुण, मयूर सूर्यकांत ढगे १०३ गुण, वैष्णवी सुरेश खैरे १०२ गुण, श्रेयस दत्तात्रय खैरे १०१ गुण, प्रणव विनायक गायकवाड ९३ गुण अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी गुण मिळावीत यश संपादित केले आहे.
सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना वर्गशिक्षक मनोज धुमाळ, प्रा. अविनाश दौंडकर, प्रा. धनंजय तळोले, प्रा. दगडू दंडवते यांनी मार्गदर्शन केले तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण उपायुक्त हरुण आत्तार, संस्थेचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोले, सरपंच चंद्रभागा खर्डे, विद्या विकास मंडळाचे सर्व संचालक, ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.