भिम आर्मीची कामगारांबाबत डाॅंगकाॅंग कंपनीशी सकारात्मक चर्चा

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): भिम आर्मी भारत एकता मिशन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर तालुका प्रभारी संदिप शेलार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि 15) रोजी संविधानिक पध्दतीने जन आंदोलन करण्यात आले होते. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील डाॅंगकाॅंग कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात या संघटनेने आवाज उठवला होता. यावेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ ऊर्फ बंटी नवले, महाराष्ट्र राज्य दलित सेवा सामाजिक संघटनेचे राज्य संघटक सतिष चांदणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मनोज जगताप या सर्व संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या आंदोलनास पाठिंबा दिला.

यावेळी कंपनी व्यवस्थापन आणि आंदोलक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. ह्या आंदोलनात महिला नेत्या मंजुषा कुलकर्णी, शिरूर तालुका अध्यक्ष दिपिका भालेराव, माहिला आघाडी अध्यक्षा सुनिता सोनकांबळे , उपाध्यक्ष कविता भवार, संघटक साक्षी लोमाळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रियाज शेख, पुणे जिल्हा महासचिव अविनाश उबाळे, शिरुर तालुका मुख्य महासचिव अजित नरवडे, युवा नेते महेश कुलकर्णी, संजय गव्हाणे, गणेश जाधव, गणेश रहाटे, भाऊ उमाप, तसेच मोठया प्रमाणात महिला व भीमसैनिक उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे बोलताना म्हणाले, रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कामागारांना कामाबाबत काही समस्या, अडचणी असतील तसेच ठेकेदारांकडून काही अनुचित प्रकार घडत असेल तर संघटनेच्या माध्यमातून ताबडतोब न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. यावेळी रांजणगाव औद्योगिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार ब्रम्हा पोवार, विलास आंबेकर, संतोष औटी, विजय सरजिने, महिला कॉन्स्टेबल वाघमारे, सात्रस, घुले, पवार तसेच अनेक पोलिस कर्मचारी उपस्थित होते.