शिरुर तालुक्यात बापानेच केला नववीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा बापाने विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नराधम बापावर विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील नववीत शिक्षण घेणाऱ्या मुलीची आई कामावरून आलेली असताना मुलगी रडत असल्याने आईने रडण्याचे कारण विचारले असता तिने मी झोपल्यानंतर वडील जवळ येऊन माझ्याशी लगट करुन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत असल्याचे मुलीने सांगितले. तसेच यापूर्वी देखील अनेकदा तिने मला एकटी असल्याचे पाहून असे कृत्य केल्याचे सांगितल्याने मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

याबाबत पिडीत अल्पवयीन युवतीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या नराधम बापा विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.