न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या आठवणींना कन्हेरसर करांकडून उजाळा

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्ह्यातील कन्हेरसर गावचे सुपुत्र असलेले धनंजय चंद्रचूड यांनी भारताचे पन्नासावे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतल्याने कन्हेरसर गावाला दुसऱ्यांदा सरन्यायाधीश पदाचा मान मिळाला असल्याने कन्हेरसर येथे ग्रामस्थांनी जल्लोष करत न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Ranjangaon marathon
Ranjangaon marathon

कन्हेरसर ता. खेड येथील यशवंतराव चंद्रचूड यांनी यापूर्वी भारताच्या सरन्यायाधीश पदाची धुरा सांभाळलेली असताना आता नुकतेच त्यांचे पुत्र असलेले धनंजय चंद्रचूड यांनी देशाच्या पन्नासाव्या सर न्यायाधीश पदाची धुरा हाती घेतल्याने कन्हेरसर गावाला दुसऱ्यांदा सरन्यायाधीश पदाचा मान मिळाला आहे.

यापूर्वी सरन्यायाधीश म्हणून सर्वाधिक काळ म्हणजे सलग 7 वर्षे आणि ४ महिने एवढा कार्यकाळ (सन १९७८ ते सन १९८५) हा माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांना मिळाला होता. चंद्रचूड यांनी कनेरसर, पुणे, मुंबई आणि दिल्ली असा शैक्षणिक प्रवास करत यशवंतराव यांचे सारखाच शैक्षणिक प्रवास न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांचा आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी कन्हेरसर या मूळ गावी चंद्रचूड वाडा उभारलेला असून आज देखील तो वाडा आज देखील उभा आहे.

कन्हेरसर व निमगाव येथे त्यांच्या कुटुंबियांकडून काही प्रमाणात शेतीही त्यांच्या कुटुंबीयांकडून केली जाते. आज धनंजय चंद्रचूड यांनी देशाच्या पन्नासाव्या सर न्यायाधीश पदाची अनेक ग्रामस्थांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला असून कनेरसर येथील यमाई देवी व निमगाव येथील खंडोबा या कुलदैवत ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी चंद्रचूड परिवार कुठलाही गाजावाजा न करता येवून जात असल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली आहे. तर गावात आल्यानंतर चंद्रचूड हे प्रामुख्याने शिक्षणाबाबतची माहिती घेत असल्याचे देखील काही ग्रामस्थांनी सांगितले आहे.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आमच्या गावातील पिता पुत्र दोघे देखील देशाच्या सर न्यायाधीश पदी विराजमान झाले हि आमच्या साठी अभिमानाची बाब आहे असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

आज आम्हाला या क्षणाचा खूप आनंद होतो, दोघा पिता पुत्रांनी हे पद भूषवून आमच्या गावाचे व जिल्ह्याचे नाव उंचावून देशाला पुढे नेले आहे, ज्यावेळी ते गावात येतात तेव्हा गावातील सुधारणा सह शिक्षणाबाबत चौकशी करतात असे धनंजय चंद्रचूड यांच्या भावजई सुनंदा चंद्रचूड यांनी सांगितले.