शाळेच्या विकासात ग्रामस्थ व शिक्षकांचे योगदान महत्वाचे

शिरूर तालुका

शिरुर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांचे प्रतिपादन

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत शाळेचा विकास व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचे आदर्श काम करत असून शाळेच्या विकासात शिक्षकांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिरुर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी केले.

केंदूर (ता. शिरुर) येथील पऱ्हाडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने नुकताच जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली थिटे व सहशिक्षिका मनीषा साकोरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी शिरुर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, क्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष विकास दरेकर, रोटरी क्लब पुणे चे संचालक प्रदीप खेडकर, पऱ्हाडवाडी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत पऱ्हाड, ग्रामपंचायत सदस्य राघू नप्ते, उद्योजक अविनाश साकोरे, नप्ते वस्ती शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष निलेश नप्ते, माऊली नप्ते, शहाजीराजे भोसले, संतोष दरेकर, युवा नेते अनिल नप्ते, आदर्श शिक्षक विश्वास साकोरे, शिरूर तालुका शेतकरी सेना प्रमुख रवी नप्ते यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना शाळेतील भौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास हा कौतुकास्पद असून शाळेसाठी शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी भरीव व सुंदर काम केल्याचे काम इतरांना प्रेरणा देणारे असल्याचे देखील माजी सभापती प्रकाश पवार यांनी सांगितले.

दरम्यान क्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष विकास दरेकर यांनी रोटरीच्या माध्यमातून शाळेला मदत करण्याची मागणी प्रदीप खेडकर यांना केली असता त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत शाळेला मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका वैशाली थिटे यांनी सर्वांचे आभार मानले.