shirur-taluka-logo

डिलाईट इन्स्टिट्यूट मध्ये मुलींनी मारली बाजी

शिरूर तालुका

शिक्रापूर: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने घेतलेल्या उन्हाळी परीक्षा २०२२ मध्ये डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने उत्तुंग यश मिळविले आहे. मंडळाच्या वतीने सदर निकाल मंडळाच्या संकेत स्थळावर नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

कोरेगाव भिमा येथील अल अमिन एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशन संचालित डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल उत्कृष्ठ लागला आहे. प्रथम वर्षाच्या निकालामध्ये सोनाली वाघ हिने ८०.३० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर किर्ती वाळुंज हिने द्वितीय आणि पार्थ कदम याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर द्वितीय वर्षाचे निकालामध्ये पुजा फडतरे हिने ८४.७० टक्के गुण मिळवून प्रथम आली असून प्रगती वाडेकर ८२.३० टक्के गुण मिळवून द्वितीय व मोनाली खासे हिने ८१.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

विद्यार्थ्यांचा या उज्वल यशाबद्दल अल अमिन फौंडेशनचे अध्यक्ष नाशिर शेख, सचिव जुबेर शेख, झाहिद शेख, अमिर इनामदार, प्राचार्य डॉ. संपत नवले यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.