निर्वी येथे ऊस शेतीशाळा उपक्रमाचा शेतकऱ्यांना लाभ

शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके): एकरी ऊसाच्या क्षेतातुन 40 ते 45 हजार ऊस कारखान्याला जात असल्याने उसाचे वजन वाढण्यासाठी फुटव्यांची संख्यावर नियंत्रण ठेवल्यास एकरी 100 टन उत्पादन घेण सहज शक्य होईल अशी माहिती कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे यांनी निर्वि (ता. शिरुर) येथे ऊस शेतीशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले. पिकावरील रोग व किड सर्वेक्षण योजना (क्रॉपसॅप ) अंतर्गत ऊस पिकावर शेतकऱ्यांची शेतीशाळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे एकुण 10 वर्ग शेतात घेण्यात येणार असुन प्रत्यक्ष शेतातच ऊस लागवड तंत्रज्ञान कृषी सहायक जयवंत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येणार आहे.

ऊस शेतीशाळा महिन्यातुन एक वर्ग होणार आहे सकाळी 8 वाजता वर्ग सुरू करुन वर्गात प्रथम प्रतिज्ञा नंतर कार्यक्रमाची रुपरेषा मागोवा निरीक्षण चित्रीकरण सादरीकरण विशेष अभ्यास लघु प्रयोग लघु अभ्यास शेवटी मुल्यमापन अशा पध्दतीने वर्गाचे आयोजन केले जाते संपन्न झालेल्या शेतीशाळेत संजीव माने यांचे उस उत्पादनाचे पंचसूत्री लॅपटॉप वर दाखविण्यात आली. तसेच निरीक्षण करताना साडेचार फुटात किति फुटवे असावे व किती आहेत हे शेतकऱ्यांनी बारकाईने निरीक्षण घेतली. सदरच्या ऊस क्षेत्रात फुटवे कमी असल्याचे निदर्शनास आले शेतीशाळा वर्गात प्रविण सोनवणे यांचे तसेच त्याच धर्तीवर प्रफुल्ल सोनवणे दत्तात्रय सोनवणे यांनी लागवड केली असुन शेतीशाळा उपक्रमांमुळे ऊस लागवड तंत्रज्ञान या विषयाचा शेतकऱ्यांचा सखोल अभ्यास होणार आहे.

या उपक्रमांमुळे अजित पोपटराव सोनवणे 2 लिटर, प्रफुल्ल कुंडलिक सोनवणे 5 लिटर, दत्तात्रय पोपट सोनवणे 3 लिटर, प्रविण बळवःत सोनवणे 1 लिटर, संभाजी लक्ष्मण सोनवणे 1 लिटर मोहनदादा माणिकराव सोनवणे 8 लिटर पोपट केशव पवार 3 लिटर असे जीवाणु खतांचे महत्त्व पटल्याने मागणी केली आहे. तर ऊसाचे पाचट न जाळता पाचट कुजविण्याची प्रक्रिया करुन सेंद्रिय खत निर्मितीसाठी निलेश पांडुरंग सोनवणे यांनी डिकंपोझर 8 लिटरची मागणी केली आहे. हे शेतीशाळेचे मोठे यश असल्याचे जयवंत भगत यांनी सांगितले.

तसेच हा उपक्रम अधिक प्रभावाशाली व्हावा म्हणून बालेशा कृषी विज्ञान मंडळाची निर्मिती करण्यात आली असुन दर महिन्याला एक चर्चासत्र आणि शिवार फेरी या विज्ञान केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. या ऊस शेतीशाळेसाठी प्रफुल्ल सोनवणे प्रविण सोनवणे, अजित सोनवणे, आप्पासाहेब सोनवणे, संतोष सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, बळवंत सोनवणे, संभाजी सोनवणे यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रविण सोनवणे व कृषी सहायक जयवंत भगत यांनी योगदान दिले.

1 thought on “निर्वी येथे ऊस शेतीशाळा उपक्रमाचा शेतकऱ्यांना लाभ

Comments are closed.