शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेस डॉक्टर द्या

शिरूर तालुका

भाजपा कामगार आघाडीच्या जयेश शिंदेंची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भय ग्रामीण रुग्णालय असून सदर ठिकाणी महिलांच्या प्रसूती दरम्यान सिझेरियन शस्त्रक्रिया साठी डॉक्टर उपलब्ध नसून ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरची नेमणूक करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधा नागरिकांना भेटत असल्याने परिसरातील कामगार व शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ होत आहे. गरोदर महिलांचे उपचार देखील सदर ठिकाणी होत असल्याने महिला प्रसूतीसाठी देखील ग्रामीण रुग्णालयात आलेल्या असतात. मात्र काही महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. मात्र येथे सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने महिलांना खाजगी रुग्णालयात जाण्याची वेळ येथे आणि खाजगी रुग्णालयात जास्त पैसे मोजावे लागत.

त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या प्रसूती दरम्यान आवश्यकतेनुसार सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरचे नेमणूक करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे. तर याबाबत आपण लवकरच योग्य निर्णय घेऊ, अशी ग्वाही देखील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.