अनाथ व भटकंती करणाऱ्या मुलांसमवेत महिला दिन साजरा

शिरूर तालुका

शिक्रापूरच्या गार्डन सिटी महिला मंचच्या महिलांचा अनोखा उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा होत असताना काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने शिक्रापूरच्या गार्डन सिटी महिला मंचच्या महिलांनी एकत्र येत अनाथ व भटकंती करणाऱ्या मुलांना गरजेचे साहित्यासह खाऊ देत महिला दिन सहारा करुन समाजाला आगळावेगळा संदेश दिला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गार्डन सिरी महिला मंचच्या महिलांनी एकत्र येत महिला दिन साजरा करत अनाथ व गरजू मुलांना मदत करण्याचा निर्णय घेत कासारी फाटा येथील आशीर्वाद ट्रस्टच्या वतीने अनाथ व भटकंती करणाऱ्या मुलांसाठी असलेल्या गुरुकुल वसतीगृह येथील मुलांना खाऊ वाटप करत मुलांना गरजेच्या वस्तू देऊन महिला दिन साजरा केला.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मोनिका जगताप, अपेक्षा पिंपळकर, दिपाली गायकवाड, शितल ठाणगे, सारिका औटी, रोहिणी कापरे, प्रतीक्षा पाटील, शितल शिवले, प्रियंका शेडगे, नीलम सिंग, श्वेता तक्ते, मुनमुन मुखर्जी, पूजा ढेकणे, सपना साळवी, रेवती गावस्कर, अश्विनी जाधव यांसह आदी उपस्थित होते, तर यावेळी बोलताना महिलांनी अशा प्रकारे गरजूंना मदतीसाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या मोनिका जगताप यांनी व्यक्त केले. दरम्यान गुरुकुल वसतीगृहच्या संचालिका सावित्रा शिंदे यांनी महिलांचे आभार मानले.