शाळेतील सुविधांचा वापर करत विद्यार्थ्यांना सक्षम बनवावे; अंकुश शिवले

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शाळेतील भौतिक सोयी सुविधा तसेच शैक्षणिक साहित्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधुनिक भारताचा सक्षम नागरिक बनवावे, असे प्रतिपादन वढू बुद्रुकचे माजी सरपंच अंकुश शिवले यांनी केले.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळा शिवले मळा या शाळेला एच एम क्लाउस इंडिया प्राव्हेटेड लिमिटेड या कंपनीने दिलेल्या अत्याधुनिक संगणक कक्ष खोलीचे भूमीपूजन माजी सरपंच अंकुश शिवले, कंपनीचे व्यवस्थापक डियोन नेगी, जेम्स ब्रूस्का यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सारिका शिवले या होत्या, तर याप्रसंगी उपसरपंच राहुल कुंभार, माजी सरपंच अनिल शिवले, ग्रामपंचायत सदस्य माऊली भंडारे, माजी चेअरमन संजय शिवले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव शिवले, रेखाताई शिवले, सुरेश दरगुडे, सचिन शिवले, कृष्णा आरगडे, अंजली शिवले, संजय म्हस्कु शिवले, जालिंदर शिवले, हनुमंत शिवले, शंकर शिवले, बाबाजी शिवले, शंकरराव शिवले, आनंदराव शिवले, गुरुप्रसाद गड्डेकरी, सर्जेराव शिवले, सुरेश दरगुडे, रेखा शिवले, अर्चना भंडारे, बंडू तापकीर, मुख्याध्यापक रविंद्र शिवरकर, राजाराम सकट यांसह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना शाळेच्या सुधारणेसाठी ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य असून परिसरातील अनेक कंपन्या देखील शाळेला मदतीसाठी पुढाकार घेत असल्याने शाळेचा भौगोलिक विकास होत आहे. मात्र शाळेतील शिक्षकांसह पालकांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते कडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे माजी सरपंच अंकुश शिवले यांनी सांगितले, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र शिवरकर यांनी केले तर राजाराम सकट यांनी आभार मानले.