शिक्रापुरात बालदिनानिमित्त पन्नास बालकांना पुस्तक भेट

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत मार्फत चालवल्याजाणाऱ्या भैरवनाथ मोफत वाचनालयच्या बालदिन साजरा करत शाळेतील पन्नास बालकांचा पुस्तक व गुलाब पुष्प भेट देऊन बालदिन साजरा करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मोफत वाचनालयच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरु जयंती व बालदिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती महाजन, उद्योजक शिराजभाई शेख, महंमद तांबोळी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड, ग्रंथपाल संतोष काळे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रसाद वाडेकर, मुख्याध्यापिका रतन मंडलिक, दत्तात्रय तांबे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत मान्यवरांच्या हस्ते 50 बालकांना पुस्तक व गुलाब पुष्प भेट देण्यात आले. दरम्यान दत्तात्रय तांबे यांनी पंडित नेहरु यांच्या जीवन कार्याविषयीची माहिती लहान मुलांना दिली, तर सरपंच रमेश गडदे व ग्रंथपाल संतोष काळे यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या असून यावेळी चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सदर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल संतोष काळे यांनी केले तर दत्तात्रय तांबे यांनी आभार मानले.