रामलिंग महिला उन्नत्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने श्रमदान करत स्वच्छता अभियान

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रविवार 1 ऑक्टोबर 2023 रोजी श्रमदान उपक्रमांतर्गत “एक साथ एक घंटा स्वच्छता के लिए श्रमदान” उपक्रमा अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन रामलिंग येथे स्वछता अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी लहान मुलांनी आमचा गाव कचरामुक्त करु, आमचा गाव स्वच्छ व सुंदर ठेऊ अशी स्वछतेची शप्पत घेतली.

 

यावेळी रामलिंग महिला उन्नत्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीने समाजाचा घटक म्हणुन आपले घर,परिसर,सार्वजनिक ठिकाणे स्वछ ठेवली पाहिजे. यामुळे आरोग्य सुंदर राहील आणि रोगराई नष्ट होईल. यावेळी सर्वांनी सार्वजनिक ठिकाणचा परिसर खराटे, झाडू घेऊन स्वच्छ केला. यावेळी लहान मुले,महिला यांनीही सहभाग घेतला होता. तसेच माजी सैनिक प्रदीप कोल्हे यांनी ही हातात खराटा घेत स्वछता केली. या स्वछता अभियानात गायत्री डींगरे, ममता गोसावी, आशा जाधव, छाया ढवळे, सीताबाई चव्हाण, नंदा खरे आदी महिला उपस्थित होत्या.