सविंदणे: शिरुर तहसिल कार्यालयाला वर्षापुर्वी महसुलच्या तत्कालीन आधिकारी यांनी आपल्या पाठीमागे लागलेल्या ससेमिऱ्यातून सुटका होण्यासाठी अंधश्रद्धेतून आपल्या केबिनला चक्क बोडकाचा नैवेदय दाखवला होता. त्यानंतर तहसिलच्या या अनागोंदी कारभाराची दखल घेत मनसेने तहसिल कार्यालयात सत्यनारायण पुजा घातली होती. त्यानंतर तत्कालीन तहसिलदार यांची बदली झाल्यानंतर प्रभारी तहसिलदार रंजना ऊंबरहांडे यांची नियुक्ती झाली.

परंतु त्यांना पुणे येथिल चार्ज असल्याने शिरुरमध्ये अतिरीक्त चार्ज असल्याने तहसिल कार्यालयात जास्त लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचे नागरीक सांगत आहे. गेले अनेक महीन्यांपासून शिरुर तहसिल कार्यालयातील रस्ता केसेस, पुर्नवसनच्या, कलम -१५५ अंतर्गत चुक दुरुस्तीच्या, रस्त्याच्या केसेस अश्या विविध संकलनाची कामे प्रलंबित असून नागरीक वारंवार हेलपाटे मारत असून त्यांची कामे मार्गी लागत नसल्याचे पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी सांगितले.
यामुळे आता विविध सामाजिक संघटना व राजकिय पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन या विषयी आवाज उठवणे गरजेचे आहे. त्यामुळे तहसिल कार्यालयाला बोडकाचा नैवेदय दाखवून नागरीकांची रखडलेली कामे व तत्कालीन अधिकाऱ्यांच्या मागे लागलेले ग्रहण संपण्याची चिन्हे दिसून येत नसल्याची चर्चा शिरुर तालुक्यात खुबीने होत आहे.