शिरुर येथील नितीन सावंत उर्फ धर्मकीर्ती परभणीकर यांचे व्याख्यान रद्द करण्याची विश्व हिंदू परीषदेची मागणी

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात दि १७ फेब्रुवारी रोजी नितीन सावंत उर्फ धर्मकीर्ती परभणीकर नामक व्यक्तीचे व्याख्यान होणार असल्याबाबतचे शहरात फ्लेक्स लागले आहे. या व्यक्तीचा इतिहास पाहता या व्यक्तीची वक्तव्ये ही नेहमीच भडकाऊ व दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी असतात. या व्यक्तीने सतत टिपू सुलतान सारख्या क्रूर धर्माचांचे उदात्तीकरण व्याख्याने व कीर्तनांमधून केले आहे.

याउलट संपूर्ण हिंदू समाजासाठी देवतातुल्य असेलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे दैवतीकरण करु नका असे म्हणून त्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न या व्यक्तीने वारंवार केला आहे. करोडो लोकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा देवाचाही अपमान केला असून ते देव नाहीत असे सांगून या व्यक्तीने वारंवार अपमान केला आहे. एवढेच नाही तर लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांसारख्या भारतरत्नांवरही या व्यक्तीने सतत चिखलफेक केली आहे. त्यामुळे शिरुर येथील विश्व हिंदू परीषदेने हे व्याख्यान मागणी रद्द करण्याची मागणी केली असून शिरुर पोलिस स्टेशनला याबाबत लेखी पत्र दिले आहे.

Video; घोडगंगा कारखान्याच्या थकीत पगारासाठी कामगार चढले धुराड्याच्या चिमणीवर