मांडवगणमध्ये समाज कंटाकांनी दगड घालून तीन बाकडे फोडले

शिरूर तालुका

मांडवगण फराटा (संपत कारकूड): ग्रामपांचातीच्या निधीतून नागरिकांना बसण्यासाठी गेल्या आठ दिवसांपूर्वी बसविण्यात आलेले 3 सिमेंटी बाकडे गावातील समाजकंटकाकडून मोठा दगड घालून फोडण्यात आलेले असून गावाचे सार्वजनिक नुकसान केल्यामुळे गावात या घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

मांडवगण फराटा येथील सरपंच शिवाजी आण्णा कदम हे गावातून थेटचे सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत. ते गेली चार वर्षापेक्षा जास्त कालावधी गावात सरपंच म्हणून कामकाज पाहत आहेत. गावातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढून साठ फूट रुंद व अंदाजे दोन हजार फूट लांब रस्ता तयार करुन घेतला आहे. हे काम करताना त्यांना नागरिकांच्या रोषाला समोरेही जावे लागले, अनेक ठिकाणी वाद-विवाद, कोर्ट-कचेऱ्या सरपंचांना कराव्या लागल्या परंतु रस्त्याच्या कामात कोणतीही तडजोड न करता त्यांनी ना भूतो-ना भविष्यते असा रस्ता गावात तयार केला आहे.

गाव अधिक सुशोभित व्हावे यासाठी जेष्ठ व इतर नागरिकांना बसण्यासाठी गावच्या निधीतून २०० बाके खरेदी केली आणि ती दवाखाना, बाजारतळ तसेच मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात आली. हे सर्व काम करण्यासाठी गावचा निधी खर्ची टाकला. परंतु गावातील अज्ञात माथेफिरुने मात्र गावातील तीन बाकडांवर रात्रीच्यावेळी दगड टाकून बाकड्यांची तोडफोड केली आहे.

गुन्हा दाखल करणार: सरपंच 

गावात सार्वजनिक नुकसान करुन गावची शांतता भंग करणाऱ्याविरोधात शिरुर येथे जाऊन गुन्हा दाखल करणार असून बाके तोडफोड केल्यानंतर मी गावामध्ये याचे फोटो पाठवले आहेत. गावातून यावर गंभीर टीका व टिपणी आलेली आहे, असे नुकसान खपून घेतले जाणार नाही.

यासाठी गावातील सिसिटीव्ही कॅमेरे वेळेत चालू करायला हवे होते. लाखो रुपये खर्चून कॅमेरे बंद आहेत.काँट्रॅक्ट घेणाऱ्यांवर सर्व जबाबदारी असतानाही काहीच कारवाई केली नाही. ग्रामसभेत सिसिटीव्ही कॅमेरे ठेकेदारास कॅमेरे बदलून दिल्याशिवाय बिल देऊ नका तरीही बिले देण्यात आली. यातून काय संदेश घ्यायचा. ते सर्व सुरळीत असते तर आज बाके तोडणारे कॅमेराच्या फुटेज मध्ये दिसले असते.

हनुमंत पंडित

पत्रकार

त्या समाजकंटाकावर कारवाई झाली पाहिजे. आपल्या कडे बोलण्यापेक्षा बघणारी लोक जास्त आहे. नाहीतर हे दिवस आले नसते.

किसन भोसले

सामाजिक कार्यकते