घोड धरण 100 टक्के भरल्याने शिंदोडी ग्रामस्थांनी केले जलपूजन

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतीसाठी वरदान ठरलेले घोडधरण 100 टक्के भरल्याने या धरणाच्या पाण्याचा वर्षभर शेती व पिण्यासाठी गावाला फायदा होत असल्यामुळे शिंदोडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार (दि 1) रोजी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मनोहर वाळुंज व त्यांच्या पत्नी नंदा दत्तात्रय वाळुंज यांच्या हस्ते घोडधरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.

 

यावेळी शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बलभीम वाळुंज, माजी अध्यक्ष एकनाथ वाळुंज, संचालक विठ्ठल दुर्गे, भगवंत वाळुंज, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ (पाटील), भाऊसाहेब माने, आप्पा भोस, भिमा होले, अर्जुन होले, जनार्दन होले आदी उपस्थित होते.