शिरुरमध्ये दिव्यांग बांधवांचा एकमेकांना लाडू भरवत जल्लोष

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी दिव्यांग मंत्रालय स्थापन करणार असल्याची घोषणा केल्याने आज दुपारी 12 च्या दरम्यान शिरुर येथील पंचायत समितीच्या दिव्यांग कक्षा समोर ढोल, ताशांच्या गजरात लाडू शिरुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जल्लोष केला.

Ranjangaon marathon
Ranjangaon marathon

यावेळी प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा अनिता कदम, जिल्हा महिला उपाध्यक्षा उज्वला गाडेकर, जिल्हा कार्याध्यक्षा सुप्रिया लोखंडे, शिरुर तालुकाध्यक्ष अ‍ॅड राहुल वाळके, शिरुर तालुका महिलाध्यक्षा ज्योती हिवरे, महिला शहरध्यक्षा नयना परदेशीं, शहर अध्यक्ष मनिष सोनवणे, गणेश कचरे, संभाजी नवले, नारायण नवले, खंडेराव गोरडे, माया फलके, विभाग प्रमुख कुंडलिक वायकुळे, गेनू जाधव, रामदास गव्हाणे, वंदना शिरतोडे, रेश्मा कडलक, वंदना रामगुडे, दादाभाऊ निचित अशोक बोरकर, विजय काटे, कैलास पवार, मोहन चव्हाण, पूजा भगत, राजा चव्हाण, जितेंद्र भगत,हनुमंत गाडेकर, दुर्गम खैरे तसेच शिरुर तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.