शिरुर तालुक्यात परप्रांतीयाने फुलवली काळ्या ऊसाची शेद्रीय शेती

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथे एका परप्रांतियाने चक्क तामिळनाडू येथील उत्पादित ब्लॅक शुगर किंग या काळ्या ऊसाची शेंद्रीय पद्धतीने शेती करुन अनोखा प्रयोग शिरुर तालुक्यात करत प्रयोग यशस्वी केला आहे.

कासारी (ता. शिरुर) येथील निमगाव म्हाळुंगी रोड लगत रामसिंग चितोडिया हे काही वर्षांपूर्वी राजस्थान येथून वास्तव्यास आले. त्यानंतर त्यांनी गावामध्ये एका ठिकाणी भाडेतत्वावर शेती घेऊन आगळीवेगळी शेती करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर त्यांनी परिसरात कोठेही नसलेला तसेच आयुर्वेदिक समजल्या जाणाऱ्या तामिळनाडू ब्लॅक शुगर किंग या ऊसाची शेती करण्याचे ठरवत थेट तमिळनाडू येथे जात उसाचे लागवडीसाठी बेणे आणले त्यांनतर त्यांनी 20 गुंठे जमिनीत सदर ऊसाची शेणखतात लागवड करुन नंतर सदर पिकासाठी शेण, बेसन पीठ, गोमुत्र व दही यापासून जिवामृत बनवून पिकाला खत म्हणून वापरले.

सध्या ऊसाची चांगल्या प्रकारे वाढ झाली असून सदर ऊस परिसरात चर्चेचा विषय बनू लागला असून अनेक जण सध्या सदर शेतात भेट देऊन शेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या काळ्या उसाची पाहणी करत आहे.

काळ्या उसाचे फायदे

कासारी येथे पिकवण्यात आलेल्या काळ्या ऊसामुळे शरीरातील उष्णता कमी होणे, रक्त पातळ होणे, शरीरात केल्शियाम वाढणे यांसह आदी आयुर्वेदिक फायदे होत असल्याचे बोलले जात असून पुणे मुंबई सह शहरांच्या ठिकाणी बाजारपेठेत या काळ्या उसाला विशेष मागणी आहे.