करंदीकरांनी अनुभवली संगीतमय दिवाळी पाडवा पहाट

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे नुकतेच संगीतमय दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले असता गावातील प्रतिभावंत कलाकारांनी यामध्ये सहभाग घेत आठ वर्षांच्या कलाकारापासून ते एकवीस वर्षांच्या युवकांपर्यंतच्या 22 कलाकारांनी दिवाळी पाडवा पहाट मध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे आपल्याच गावातील बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी करंदीकर एकवटल्याने मोठ्या उत्साहात दिवाळी पाडवा पहाट संपन्न झाली आहे.

करंदी (ता. शिरुर) येथे आम्ही करंदीकर ग्रुपच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात उपस्थित महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी भल्या पहाटेच महिलांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती, प्राजक्ता झेंडे, प्रगती साकोरे, वैभव महाराज झेंडे, सार्थक महाराज दरेकर, शुभम नप्ते, वेदांत नप्ते, अंजली नप्ते, सिद्धी ढोकले, राजलक्ष्मी नप्ते, रितिका नप्ते, तेजस्विनी नप्ते, अनुष्का नप्ते, चैतन्य दरेकर, तेजस्विनी नप्ते, ज्ञानेश्वरी नप्ते, हर्षदा नप्ते, राजनंदिनी दरेकर, विघ्नेश नप्ते, आदित्य नप्ते, धनंजय नप्ते, पार्थ नप्ते, अर्णव कदम या बाल कलाकारांनी त्यांची कविता सादर करत उपस्थितांची भल्या पहाटे मने जिंकली.

दरम्यान करंदीकरांनी या बाल कलाकारांवर बक्षिसांचा वर्षाव केला असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी कलाकारांना सन्मानित करत मिठाई वाटण्यात आली. तर करंदी ग्रामस्थां सह पदाधिकाऱ्यांनी दिवाळी पहाटच्या निमित्ताने एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या आहे.

सणसवाडीतून क्रूरपणे गायांची वाहतूक करणाऱ्यावर गुन्हे