शिरुर शहरात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरात स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट व स्टोरी ठेवून दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने याबाबत रेहान असिफ काझी या युवकांवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान असिफ काझी व इतर चार इतर अल्पवयीन मुलांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट व स्टोरी ठेवल्याचे शिरुर पोलिसांच्या निदर्शनास आले.यावेळी पोलिसांनी असिफ सह चार अल्पवयीन युवकांवर ताब्यात घेत कारवाई केली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र गोपाळे यांनी फिर्याद दाखल केल्याने संबंधित युवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे भेट घेत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे,शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, नायब तहसिलदार स्नेहा गिरिगोसावी आदींसह पोलिस अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.