शिरुर (अरुणकुमार मोटे): निर्भिड व उत्तुंग विचारांच्या मैत्रा फौंडेशन बीड विचारपीठ यांच्या वतीने देण्यात येणारा महर्षी गुणवंत शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार शिक्रापूरच्या कोयाळी पुनर्वसन शाळेतील उपक्रमशील शिक्षिका स्वीटी खरात यांना जाहीर झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बीड येथे मोठ्या थाटात पुरस्कार सोहळ संपन्न झाला.
मैत्रा फाउंडेशन वतीने शैक्षणिक अणि समाजिक क्षेत्रात विदयार्थी-शिक्षकांसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल स्वीटी खरात यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या अतिशय भव्यदिव्य कार्यक्रमात अनेक साहित्यिक मंडळी तसेच नामवंत कवी पत्रकार, शिक्षक नेते आदी मान्यवरांच्या हस्ते शाल, शानदार सन्मानचिन्हासह सन्मानपत्र देऊन स्वीटी खरात यांना हा महर्षी गुणवंत शिक्षक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वीटी खरात या एक शिक्षिका आहेत. विद्यार्थी-शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी अहोरात्र झटत असतात व त्यांच्या मदतीसाठी दिवसरात्र हजर राहतात तसेच विद्यार्थी शिक्षकांसाठी वर्षभर अनेक उपक्रम राबवितात. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. याची दखल घेत त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्वीटी खरात यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना संगितले की “मैत्रा फॉउंडेशन च्या वतीने मिळालेला पुरस्कार म्हणजे कामाची ही पावती आहे. हा पुरस्कार विध्यार्थी आणि कुटुंबासाठी तसेच आई वडील यांना समर्पित केलेला आहे.
स्वीटी मधुकर खरात