शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञान वाढीसाठी नवीन संकल्पना राबवणार: अरमीन मोदी

शिरूर तालुका
शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय मुलांच्या सध्याच्या शिक्षणात टॅब महत्वाचा घटक बनला असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी टॅब सह नवीन संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जपानच्या आस्थानो काय संस्थेच्या अरमीन मोदी यांनी केले.
कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय येथे यापूर्वी कोरोना काळामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी तीस टॅब उपलब्ध करुन देणाऱ्या आस्था नो काय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी आस्था नो काय संस्थेच्या अध्यक्षा अरमीन मोदी, जर्मनी येथील प्राध्यापिका एंडर्स काटजा, समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, संचालक गुलाब सातपुते, प्राचार्य अशोक सरोदे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यापूर्वी विद्यालयात प्रदान झालेल्या टॅब वापरण्यासंदर्भात माहिती अरमीन मोदी यांनी घेत पुढील काळात शालेय विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थिनी धनश्री नरवडे हिने मनोगत विद्यार्थ्यीनीने देखील मनोगत व्यक्त केले तर यावेळी बोलताना आस्था नो काय संस्थेने विद्यालयाला केलेले सहकार्य अत्यंत मोलाचे असल्याचे प्राचार्य अशोक सरोदे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब थोरात यांनी केले तर शिवाजी पाखरे यांनी आभार मानले.