शिरुर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सेवानिवृत्त शिक्षिकांचा सन्मान सोहळा

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) पुर्वीच्या काळात शाळामध्ये बसायलाव्यवस्थित जागा नसल्याने शेणाने सारवून घ्यावे लागत होते. अशा वातावरणात विद्यार्थी शिकून उच्चपदावर जात होते. शिक्षकांचा आदर करत होते. आत्ताच्या काळात शाळा सुंदर झाल्या. पण त्यात आदर भावना नाही. शिक्षकांविषयी आदर राहिला नाही. आता माझा मुलगा शिकला नाही तरी चालेल पण त्याला शिक्षा करु नका असा पालकांचा सुर असतो. सध्या मोबाईलचाही खुप अतिरेक झाला असल्याचे प्रतिपादन निवृत्त शिक्षिका लिलावती डुंबरे यांनी केले.

 

शिरुर शहर महिला राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या (शरद पवार गट) वतीने 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला शिक्षणदिनाच्या निमित्ताने सेवानिवृत्त शिक्षिकांचा सन्मान सोहळा आणि शिक्षण क्षेत्रातील बदलांवर संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.

 

यावेळी गोदावरी कुंडलिक, मिरा भोगावडे, सुनीता मिरजकर, मंदा भालेकर, नंदिनी शिर्के, रंजना वाखारे, उशादेवी साकोरे, चंद्रकांत बोरसे, अस्मिता डोंगरे, लीलावती डुंबरे या सेवानिवृत्त शिक्षिकांचा सन्मानचिन्ह व गुलाबचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

यावेळी मिरा भोगवडे म्हणाल्या, पुर्वी विद्यार्थ्यांच्या हातात पाटी होती आत्ता वही आली. पुर्वी विद्यार्थी एकमेकांच्या वस्तू वापरुन शाळा शिकत होते. आत्ता मात्र मुलांना सर्वच गोष्टी नवीन पाहिजेत. याला बऱ्याच अंशी पालक पण जबाबदार आहेत. तर मंदा भालेकर यांनी सांगितले की, शिक्षणाला वय नसते तर जिद्द हवी असते. घर सांभाळून महिलाही शिक्षण घेऊ शकते. त्यामुळे महिलांनी शिक्षण घेतलेच पाहिजे.

 

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शिरुर तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ, शिरुर शहर महिला अध्यक्षा डॉ स्मिता कवाद, तालुका युवती अध्यक्षा संगीता शेवाळे, रामलिंग महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले उपस्थित होत्या.यां सर्वांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षिकांना ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

तसेच या कार्यक्रमास पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरद पवार गट) उपाध्यक्ष राहिल शेख, शिरुर शहर कार्याध्यक्ष हाफिज बागवान, शिरुर शहर वरिष्ठ उपाध्यक्ष कलिम सय्यद, युवा नेते सागर नरवडे, सचिन अभंग, रोशन बाफना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षा राणी शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या शीला पाचंगे, सुवर्णा पाचंगे, रुपाली बोर्डे, ज्योती पारधी, लताबाई खपके, पत्रकार रुपाली खिल्लारी यांसह अनेक महिला होत्या.

 

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिरुर शहर युवती महिला अध्यक्षा गीताराणी आढाव यांनी तर आभार शिरुर शहर महिला अध्यक्षा डॉ स्मिता कवाद यांनी मानले.