लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत सैनिक समाज पार्टीच्या जोरदार मुसंडी मारणार:- ॲड शिवाजी डमाळे

राजकीय शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आपला देश स्वतंत्र झाला आहे पण व्यक्ती स्वतंत्र नाही…? प्रस्थापित घराणेशाही हि प्रत्येक पक्षाच्या विनाशास कारणीभूत आहे. समाजातील भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांच्या दबावातून समाजातील सर्वसामान्य नागरीकांना बाहेर काढण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे बौध्दिक आंदोलन आहे असे मत ॲड शिवाजी डमाळे यांनी व्यक्त केले.

रांजणगाव गणपती येथील हॉटेल संदीप या ठिकाणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड शिवाजी डमाळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, राजकारणात प्रवेश करणारे अनेकजण भुमाफीया,दारू माफीया दुध माफिया अशा अनेक प्रकारच्या अवैध व्यवसायातून बेहिशेबी मालमत्ता कमावून मतदारांना पैसे वाटण्याच्या कुप्रथेचा उंचाक झाला आहे.

तसेच काळ्या पैशांचा गैरवापर करत करोडो रुपये खर्च करुन निवडणुका लढविणाऱ्यांना हरविण्यासाठी ‘सैनिक समाज पार्टीचे’ सजग,सज्जन, सुशिक्षित, ईमानदार देशभक्त टॅलेंटेड प्रतिभावान बुध्दीमान उमेदवारांना अल्पखर्चात निवडून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २०२४ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत समाजातील सर्वसामान्य उमेदवारांना महाराष्ट्रातील मतदार अल्पखर्चात निवडून देऊन सैनिक समाज पार्टीचे सरकार आणण्याचा पराक्रम करुन दाखविणारं आहेत,असा विश्वास डमाळे यांनी व्यक्त केला.

 

यावेळी जनसेवक माजी सैनिक तुकाराम डफळ म्हणाले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अशा प्रकारे पत्रकार परिषदा घेण्यात येणार असुन सर्वसामान्य लोकांना ‘सैनिक समाज पार्टी’ चा मूळ उद्देश आणि ध्येय धोरणे समजावून सांगुन उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील युवाशक्ती सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडत चालल्याचे नमुद केले. या कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषदेचे आयोजन सैनिक समाज पार्टीचे युवा विभागीय प्रमुख आणि मराठवाडा युवा अध्यक्ष धिरज कांबळे यांनी केले होते.

 

यावेळी अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब भुजबळ, सैनिक समाज पार्टीचे पारनेरचे तुषार औटी, पवन प्रेमिलवड, विष्णु शिंदे, शेखर मावस्कर, आझाद समाज पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा गायकवाड, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे पुणे जिल्हा सदस्य अरुणकुमार मोटे, तालुकाध्यक्ष तेजस फडके, सचिव निलेश जगताप, प्रसिद्धीप्रमुख अर्जुन शेळके, आझाद समाज पार्टी महिला आघाडीच्या शिरुर तालुकाध्यक्षा संगिता पिटर, पत्रकार गंगेश्वर सोनवणे, उद्योजक संदीप कुटे, कृष्णा केबले, प्रकाश कर्डिले, आदिनाथ शेलार, गणेश वालेकर, सचिन सावरे, सचिन मनवर, मनीष डहाके, सुनील चव्हाण, दिगंबर मोरे, सुनील पागी, नंदकिशोर मोठे, बबलू कबले, अभिषेक हाकाले आदी उपस्थित होते.

शिरुर येथील डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि अत्याधुनिक उपचारामुळे असाध्य आजारावर रुग्णाने केली मात

शिरुर; भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची अवैध धंद्यावरुन जुंपली, एकाचे पोलिसांवर आरोप तर दुसऱ्याकडुन पाठराखण

व्हिडीओ:- घोड धरणात रात्रीस वाळू उपशाचा चालतोय खेळ, प्रशासन सुस्त आणि वाळू चोर मस्त