प्रेमानेच जग जिंकता येते; लुसी कुरियन

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या युगामध्ये मानवतेच्या मुल्याकडे आपण डोळेझाक करित आहोत. मानवीय जीवनाचा पाया प्रेम असून प्रेमाने जग जिंकता येते, असे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी केले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 50 व्या पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधीजींच्या संदेशाचे फलक हातात घेऊन मुक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुक रॅलीनंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण कुठलेही काम करा मात्र जे काम कराल ते फक्त प्रेमानेच करा, अन्यथा न केलेले बरे आणि आपण ज्या वेळेस कोणी क्रोधित असेल तर आपण त्यावेळेस शांत असावे. यामुळे हिंसा होणारचं नाही, असे मत लुसि कुरियन यांनी व्यक्त केले.

यावेळी माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, व्यवस्थापक रमेश दुतोंडे, विजय तवर, आनंद सागर, सुमित इंगळे, ऋषभ खडसे, संजय इंगळे, स्वाती पाटील, निकिता इंगळे, मिनी एम. जे यांसह आदी पदाधिकारी व परिसरातील बचत गटातील महिला तसेच माहेर संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान काढण्यात आलेल्या रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी हातामध्ये महात्मा गांधी यांच्या शांतीने चिरकाल शांती टिकते हिंसेने नव्हे, शांत व्हा मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्की सापडेल, अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला आयुष्य बदलेल यांसह आदी संदेशाचे फलक हातात घेऊन नागरिकांना अनोखा संदेश दिला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद सागर यांनी केले तर विजय तवर यांनी आभार मानले.