पाबळला मतदार नोंदणी सह आधार कार्ड जोडणी शिबिर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे यांच्या आदेशानुसार राष्ट्रिय सेवा योजनेमार्फत विशेष नव मतदार नोंदणी सह मतदार ओळखपत्र व आधार कार्ड जोडणी शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले असून यावेळी विद्यालयातील 50 विद्यार्थ्यांनी नव मतदार नोंदणी केली आहे.

पाबळ (ता. शिरुर) पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय येथे नुकतेच नव मतदार नोंदणी शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी मंडलाधिकारी प्रशांत शेटे, तलाठी रमेश घोडे, प्राचार्य डॉ. संजय घोडेकर, पाबळचे मुख्याध्यापक यूनूस तांबोळी, कार्यक्रम अधिकारी प्रा. वर्षाराणी जाधव, प्रा. अमित उकिर्डे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या वतीने विद्यार्थ्यांना वोटर हेल्पलाइन ॲप ची माहिती तसेच फॉर्म कसा भरायचा याचे प्रशिक्षण देण्यात आले.

महाविद्यालयाचा युवक हा लोकशाही मधील मुख्य घटक असून युवक लोकशाहीला बळकट करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडत असतात त्यामुळे सदर व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी वोटर ॲप डाऊनलोड करुन आपापली नोंदणी करत आपले नातेवाईक व कुटुंबीय यांची मतदार ओळखपत्र व आधार कार्ड क्रमांक याची जोडणीच काम केले असून या शिबिरात विद्यालयातील तब्बल पन्नास विद्यार्थ्यांनी नव मतदार नोंदणी केली आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय घोडेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.