arrest

शिरूर तालुक्यात पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; पाहा आरोपींची नावे…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

शिरूर पोलिस स्टेशन हदीतील पाषाणमळा (शिरूर) येथील श्री शिवसाई फ्युअल स्टेशन या इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेड या पेट्रोलपंपावर १२ नोव्हेंबर रोजी चार जणांनी त्यांच्याकडील मोटारसायकलवरून येऊन पेट्रोलपंपावरील कर्मचारी यांना कोयत्याचा धाक दाखवून ४९,४०० रोख रक्कम व एक मोबाईल फोन जबरीने चोरून नेलेला होता. नमुद गुन्हयाचा तपास चालू असतानाच १५ नोव्हेबंर रोजी शिरूर पो.स्टे. हद्दीतील न्हावरा गावचे हद्दीतील आओका पेट्रोलीयम या एच.पी. कंपनीच्या पेट्रोलपंपावर सहा जणांनी मोटारसायकलवरून येऊन तेथील कामगारांना कोयत्याने धाक दाखवून २,०२,०००/- रोख रक्कम, मोबाईल फोन व पाकोट असा माल दरोडा टाकून चोरून नेला होता. अशाप्रकारे चार दिवसांचे आतच दुसरा गुन्हा घडल्याने तसेच भविष्यातसुध्दा आणखी अशाप्रकारे गुन्हे घडण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांपुढे होते.

पुणे ग्रामीण पोलिस दलाचा प्रभार नुकताच स्विकारलेले पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदरचा गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना आदेशीत केलेले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः घटनास्थळावर भेट देऊन अपर पोलिस अधीक्षक, पुणे विभाग मितेश घट्टे, उप विभागीय पोलिस अधिकारी, शिरूर विभाग यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि.. सचिन काळे, पो.स.ई. गणेश जगदाळे, पो.स. ई. अमित सिव-पाटील, सहा फौज, तुषार पंदारे, पो.हवा. राजू मोमीन, पो. हा जनार्दन शेळके, पो. हवा. गुरू जाधव, पो. ना. मंगेश बिगळे, पो.हवा. योगेश नागरगोजे, बा. सहा फौज, मुकुंद कदम यांची दोन पथके स्थापन करून तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त करून
१) करण युवराज पटारे (वय २० वर्षे, रा. गुजरमळा, शिरूर, मूळ रा. गव्हाण, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर),
२) रोहन सोमनाथ कांबळे, (वय २० वर्षे, रा. बो-हाडेमळा, शिरूर)
३) अजय जगन्नाथ माळी, (वय २३ वर्षे, रा. माठ, नेहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर)
४) अजय सोमनाथ लकारे, वय २१ वर्ष, रा. माठ, इंदीरानगर, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर) यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी त्यांचे फरार २ साथीदारांसह न्हावरा येथील पेट्रोलपंपावरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच याच टोळीपासून शिरूर येथील श्री शिवसाई फ्युअल स्टेशन या पेट्रोलपंपावरील गुन्हा उघडकीस आलेला आहे. अटक केलेल्या गुन्हेगारांकडून त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेले चार कोयते जप्त करण्यात आलेले आहेत. गुन्हयाचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पो. नि. सुरेशकुमार राऊत हे करीत असून, त्यांना पो.ना. नितीन सुद्रीक बाळासाहेब भवर हे मदत करीत आहेत.