शिक्रापुरात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संतश्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भजनासह आदि कार्यक्रम पार पाडत संत सेना महाराज यांची पुण्यतिथी नाभिक संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत सेना महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने विठ्ठल रुख्मिणी मंदिरात नाभिक समाजाच्या वतीने विठ्ठल रुख्मिणी यांचा अभिषेक करत संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्रापूर नाभिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मारुती महाजन, अध्यक्ष संदीप महाजन, उपाध्यक्ष नाना चातुर, खजिनदार प्रा. स्वप्नील महाजन, नाना साळुंके, कानिफनाथ महाजन, संजय महाजन, क्षत्रिय मराठा वारकरी संप्रदायचे विश्वस्त अनिल गायकवाड, शोभा मांढरे, संगीता गायकवाड, इंदू गायकवाड, हौसा सायकर, ज्योती महाजन, बाळासाहेब गायकवाड, संजय करंजे, ह. भ. प. लोखंडे शास्त्री महाराज. मंगल शेळके यांसह आदी पदाधिकारी व नाभिक बांधव उपस्थित होते.

यावेळी संत सेना महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करत अभिवादन करण्यात आले. दरम्यान यावेळी आयोजित भजन मध्ये अनेक महिलांनी देखील उस्फुर्त असा प्रतिसाद दिल्याने संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी झाली आहे.