shirur nagar parishad

काय ती शिरूर नगर परीषद, काय ते पैसे खाणारे लोकसेवक…

शिरूर तालुका

शिरूर शहरात अनाधिकृत बांधकामांना उत
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात गुजर मळा, प्रितम प्रकाश नगर, जोशीवाडी, मुंबई बाजार, रेव्हेन्यू कॉलनी, पवार मळा व शहरातील अनेक ठिकाणी विनापरवाना अनाधिकृतरीत्या बांधकामे सुरू असून, शिरूर नगरपरीषदेची कारवाईस टाळाटाळ करत आहे.

शिरूर शहर परिसरात सन २०१७ पासून आजपर्यंत मोठया प्रमाणात सुरू आहेत. शिरूर नगरपरीषदेने फक्त महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना १९६६चे कलम ५३ , ५४, ५६ (६) अ नुसार अनाधिकृत बांधकामांना फक्त नोटीस दिल्या आहेत. नोटीस बजावणारे कर्मचारी व शिपाई अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून पैसे उकळत असून, कुठलीही ठोस कारवाई करत नाहीत, असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी केला आहे. लेखी ऑनलाईन पत्र मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांना पाठवले आहे.

गेल्या सहा वर्षापासून नगर परीषदेने नोटीस पाठवून पुढील कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तातडीने उचित कार्यवाही न केल्यास मनसे स्टाईलने नगर परीषदेच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा अविनाश घोगरे यांनी दिला आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

काय ती नगर परीषद, काय ते पैसे खाणारे लोकसेवक, काय ते थाटात उभे राहणारे अनाधिकृत बांधकाम एकदम ओकेच… अशी चर्चा शिरूर शहरात गमतीने होत आहे.