कुरळीच्या ग्रामसेविका ‘नॉट रिचेबल’

शिरूर तालुका

मांडवगण फराटा: कुरुळी (ता. शिरूर) येथील ग्रामसेविका कामावर सतत गैरहजर असल्यामुळे गावातील नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. आपला पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी कामावर दांड्या मारण्यास सुरवात केलेली असून, त्या आपल्या कामावर नियमित येत नसल्याच्या तक्रारी गट विकास अधिकारी यांच्याकडे गावकऱयांनी केल्या आहेत.

नुकतेच सुरु झालेले आर्थिक वर्ष आणि त्याबरोबर होणारी गावातील सर्व विकास कामे ठप्प झाली आहेत. ग्रामसेविका कधी येणार? असे प्रश्न नागरिक विचारात आहेत. गट विकास अधिकारी शिरूर यांनी एका आदेशाद्वारे येथील ग्रामसेविका ए. आर. कदम यांना कुरुळी ग्रामपंचयतीचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. या आदेशाचे पालन होत नसून, या ग्रामसेविका आदेश झुगारत असल्याच्या समोर येत आहे. ग्रामसेकाविना गाव आणि कसे चालवावे काम? हा गंभीर प्रश्न गेली सहा महिन्यांपासून सरपंचासह सर्व सदस्यांना पडला आहे.

गट विकास अधिकार्यांची दिलेली जबाबदारी ग्रामसेविका घेत नसून हे गाव त्यांच्यांकडून वाऱ्यावर सोडले कि काय? अशी चर्चा गावभर होत आहे. गावातील प्रत्येक कामामध्ये हि उणीव जाणवत असून गाव कसे चालवावे, कामे कशी करावी, नागरिकांची गैरसोय कशी टाळावी, मिटिंग कश्या घायच्या? असे एक नव्हे अनेक प्रश्न येथील प्रस्थापित बॉडीला येत आहेत. प्रत्येक ग्रामसेवकाने आपल्या कामाच्या ठिकाणी राहावे, असा नियम आहे. यासाठी ग्रामसेवकाला शासनाकडून घरभाडे भत्ता दिला जातो. परंतु, तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवक हे कामाच्या ठिकाणी राहत नसून त्यांना पगारात घरभाडे भत्ता दिला जातो, हि बाब यानिमित्त समोर येत आहे. याची गटविकास अधिकार चोकशी करणार का? कामावर सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार का? कामाच्या ठिकाणी त्यांना समज देऊन त्यांच्या लेखी खुलासा घेणार का? हे आता पाहावे लागणार आहे.

माझ्याकडे नागरगाव या गावचा मूळ चार्ज असून कुरुळी या गावचा अतिरिक्त चार्ज माझ्याकडे आहे. दोन गावचा कारभार सांभाळताना अनेक अडचणी येत आहेत. गटविकास अधिकारी शिरूर यांच्याकडे अतिरिक्त चार्ज कमी करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. असे कुरुळीच्या ग्रामसेविका ए. आर. कदम यांनी सांगितले.

सध्या गावात ग्रामसेविका दररोज येत नसल्याने विकास कामे करताना अडथळा येत आहे. ग्रामसेविका गैरहजर राहत असल्याने ग्रामपंचायतीची कर वसुली होत नाही. त्यामुळे या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे, असे कुरुळीचे उपसरपंच श्याम हरिहर यांनी सांगितले.
(क्रमश:)