shirur-tehsil-office

शिरुर तहसील कार्यालयातील अभिलेख शाखेत ‘जन्मनोंद’ घोटाळा…? कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता…?

शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तहसील कार्यालयातील अभिलेख शाखा सध्या गंभीर संशयाच्या भोवऱ्यात अडकली असुन, आर्थिक देवाणघेवाणीतून खोट्या जन्मनोंदी तयार केल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. या कथित घोटाळ्याचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता असुन, त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

शिरुर शहरात मोठ्या प्रमाणावर बोगस जन्मनोंदी झाल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे. या गैरप्रकारामागे केवळ कर्मचारीच नव्हे, तर काही राजकीय पुढारी आणि संबंधित खात्यातील अधिकारी यांची साखळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ प्रशासकीय भ्रष्टाचारापुरता मर्यादित नसून, राजकीय आश्रयाखाली चालणारा संगनमताचा खेळ असल्याचे दिसत आहे.

शिरुर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरुर मंडल कार्यालयाकडून आवश्यक कागदपत्रांची कसून तपासणी न करता बोगस पंचनामे व जबाब नोंदवण्यात आल्याची कुजबुज नागरिकांमध्ये सुरु आहे. या गंभीर प्रकरणामुळे संपुर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या प्रकरणासंदर्भात शिरुर शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांकडे ठोस पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत असून, हे पुरावे लवकरच संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करण्यात येणार आहेत. या प्रकरणी चौकशी सुरु झाल्यास अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा आणि मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष, स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा नागरिकांचा प्रशासनावरील उरलेला विश्वासही संपुष्टात येईल, असा इशारा नागरिक व सामाजिक संघटनांकडून देण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

Video: शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात तृप्ती सरोदे यांना वाढता प्रतिसाद…

शिरूर तालुक्यातील त्या परिसरात दोनदा दुरुस्ती तरीही पुन्हा उखडलेला रस्ता; कोंढणओढ्यात नागरिकांचा संताप

शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; तुझा कार्यक्रम करतोच…

www.shirurtaluka.com चे अल्पावधीतच Instagram वर दहा हजार फॉलोअर्स…

जिल्हा परिषद अपडेट! ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची प्रचारात जोरदार आघाडी!