ranjangaon-midc-election

रांजणगाव-कारेगाव एमआयडीसी येथील मतमोजणी केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट!

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या रांजणगाव-कारेगाव एमआयडीसी (ता. शिरुर) येथील स्ट्रॉंग रुम व मतमोजणी केंद्रास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी भेट देऊन कामकाजाविषयी उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या. पाहणी करतानाच जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी उपाययोजनांबाबत काही सूचना दिल्या.

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने निवडणूक आयोग, पोलिस आणि अन्य विभागांनी तयारी सुरु केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील २८९,२९० व २९१ या मतदान केंद्राना भेट दिली आणि तेथील सुविधा पाहून समाधान व्यक्त केले. रांजणगाव – कारेगाव एमआयडीसी येथील राज्य वखार महामंडळाचे गोदामाला भेट देऊन पाहणी करत उपस्थित अधिकाऱ्यांना कामकाजाविषयी सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, नोडल अधिकारी (ईव्हीएम) रुपाली आवले, सहाय्यक निवडणूक अधिकारी संगिता राजापूरकर, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते, उपविभागीय अधिकारी हरेश सूळ, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, रांजणगावचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे आदिसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या धडाकेबाज कारवाईची सगळीकडे जोरदार चर्चा

मतदान ओळखपत्र तयार करण्याची घर बसल्या सोपी पद्धत…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…