voter-id

मतदान ओळखपत्र तयार करण्याची घर बसल्या सोपी पद्धत…

महाराष्ट्र

मुंबईः नवीन ओळखपत्र तयार करण्यासाठी वा त्यात दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करता येतो. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन एक एप डाऊनलोड करावे लागेल. त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमच्या मुळ पत्त्यावर, घरपोच हे नवीन वोटर कार्ड, मतदान ओळखपत्र मिळेल.

ऑनलाईन मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी अँड्राईड आणि iOS मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर आणि प्ले स्टोअरमधून भारतीय निवडणूक आयोगाचे Voter Helpline App डाऊनलोड करा. या एपच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन मतदान ओळखपत्र आणि त्यात दुरुस्ती करु शकता.

नवीन ओळखपत्रासाठी…
मोबाईलमध्ये Voter Helpline App इन्स्टॉल करा. त्यानंतर एप उघडा. वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक कर. त्यानंतर मतदार नोंदणीसाठी आवश्यक नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डची सविस्तर माहिती भरा. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावर सबमिट बटणावर क्लिक करा. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर BLO कडून पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर नवीन मतदान ओळखपत्र तुम्हाला घरपोच मिळेल.

जुन्या ओळखपत्रातील दुरुस्तीसाठी…
Voter Helpline Appच्या मदतीने जुन्या मतदान ओळखपत्रात दुरुस्ती करु शकता. त्यासाठी या एपच्या अगदी शेवटी Complain And Registration हा पर्याय दिसेल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यामध्ये योग्य माहिती जमा करावी लागेल. ही माहिती जमा केल्यानंतर काही दिवसांत नवीन मतदान ओळखपत्र तुम्हाला घरपोच मिळेल. ऍप इन्टॉल करताना सर्वात आधी ते निवडणूक आयोगाचे अधिकृत ऍप आहे का याची खात्री करुन घ्या.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूकीबाबत फोडली डरकाळी…

Live Video:स्टेजवर हनुमानाची भूमिका करताना प्रभू श्रीरामांच्या चरणी सोडला प्राण…