jategaon teacher

डॉ. रामचंद्र देखणे यांचे कार्य अजरामर: सुगंध उमाप

शिरूर तालुका

जातेगांव बु॥: ‘सामाजीक वाटचालीत आणि साहित्यीक विश्वात आपल्या प्रतिभा संपन्न विचार शक्तीने भारूड, प्रवचन व संत साहित्याला वेगळा आयाम देणारे अग्रणी साहित्यीक म्हणून डॉ. रामचंद्र देखणे यांचे कार्य सदैव अजरामर आहे. माझ्या कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांचे मार्गदर्शन व योगदान कदापि विसरता येणार नाही,’ अशी भावना श्री संभाजीराजे विद्या संकुलाचे अध्यक्ष सुगंधराव उमाप यांनी डॉ. देखणे यांच्या श्रध्दांजलीपर शोकसभेत व्यक्त केली.

मौजे जातेगाव बु॥ येथील श्री संभाजीराजे विद्या संकुलात श्रद्धांजली सभेचे सामूहीक आयोजन करणेत आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. ललीत इंगवले, रामदास थिटे, कुलसचिव गजानन पाठक, विघालयीन शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.

सस्था सचिव प्रकाश पवार व मार्गदर्शक कांतीलाल उमाप व नियामक मंडळानेही या दुःखात सहभागी असल्याचा शोकसंदेश व्यक्त केला आहे.