रांजणगाव गणपतीः सामाजिक बांधिलकी जपत वृंदावन वॉशिंग सेंटर चे मालक सौरभ रघुनाथ पाचुंदकर यांनी हरवलेली सोनसाखळी परत केल्यामुळे आभार मानले आहेत.
रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे दिनांक 7/8/2023 रोजी MH 12 5869 ही गाडी सायंकाळी साडेचार च्या सुमारास वृंदावन वॉशिंग सेंटर येथे पञकार अर्जुन शेळके हे गाडी वॉशिंग साठी देऊन साईटला थांबले होते. गाडी वॉशिंग झाल्यानंतर ते गाडी घेण्यासाठी गेले असता त्यांच्या गळ्यामधील सोनसाखळी त्या ठिकाणी नकळत पडली. पण, हे त्यांच्या लक्षात आले नाही व ते त्या ठिकाणावरून गाडी घेऊन गेले.
घरी गेल्यानंतर सायंकाळी त्यांच्या निदर्शनास आले की आपल्याकडील सोनसाखळी गहाळ झालेली आहे. अनेक ठिकाणी शोध घेऊन सुद्धा सोनसाखळी मिळत नव्हती. दुसऱ्या दिवशी वृंदावन वाशिंग सेंटर येथे भेट दिल्यानंतर तेथे कामावर असलेले रामदास साबणे, मंगेश बोने यांना विचारपूस केले असता त्यांनी आम्हाला तुमची सोनसाखळी मिळालेली असून ती आम्ही आमच्या मालकाकडे जमा केली असल्याचे सांगितले.
वृंदावन वॉशिंग सेंटरचे मालक सौरभ पाचुंदकर यांना संपर्क केला असता तुमची सोनसाखळी कामगारांना सापडलेली आहे, असे सांगितले. दरम्यान, सोनसाखळी अर्जुन शेळके यांना परत करण्यात आली. यावेळी अर्जुन शेळके यांनी सर्वांचे आभार मानले.
शिरूर तालुक्यातील त्या तलाठ्याची दप्तर तपासणी करून मुरूम उत्खननाचा फेरपंचनामा करा…
शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू