शिक्रापूरच्या पोलिसाकडून सामाजिक भान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रविकिरण जाधव हे नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांनी नुकतेच स्वतःच्या मुलाला ज्ञानदानाचे धडे देऊन शिकवणाऱ्या शाळेला फळा भेट दिला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रविकिरण जाधव हे यापूर्वी गरजू मुलांच्या शालेपयोगी साहित्य, अनाथांना कपडे यांसह आदी सामाजिक उपक्रमात सहभाग घेत असताना त्यांनी नुकतेच त्यांच्या अर्जुन या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्चाला फाटा देत त्याला ज्ञानदानाचे धडे देणाऱ्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेला फळा भेट दिला आहे. यावेळी पोलीस नाईक रविकिरण जाधव, मुख्याध्यापक विठ्ठल पवार, किरण अरगडे, संदीप गिते, पोपट दरंदले, जयश्री पलांडे, शरीफा तांबोळी, विद्या सपकाळ, मनीषा जाधव यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनेक जिल्हा परिषद शाळेंना सध्या साहित्यांची आवश्यकता असून समाजाने यासाठी पुढे आले पहिले, असे मत पोलीस नाईक रविकिरण जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक विठ्ठल पवार यांनी आभार मानले.