Sakshi Gaikwad

साक्षी गायकवाड हिचे नीट परिक्षेतील यश म्हणजे शिरूर तालुक्याचा सार्थ अभिमान…

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) जातेगाव बु (ता. शिरूर) वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा नीट (युजी) निकाल राष्ट्रीय प्राधिकरणाने (एनटीए) बुधवारी प्रसिद्ध केला. या निकालात श्री. संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी विकास गायकवाड या विद्यार्थिनीने 632 गुण प्राप्त वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्तुंग यश मिळविले.

“साक्षीचे यश हा शिरूर तालुक्याचा गौरव आहे. प्रथम प्रयत्नातच वैद्यकीय प्रवेश परीक्षेत मिळालेले गुण साक्षीच्या अविरत परिश्रम, अभ्यासातील सातत्य व जिद्दीचे फलीत होय. विद्यार्थ्यांनी या यशापासून प्रेरणा घेत यशासाठी प्रयत्नशील रहावे,’ असे प्रतिपादन शिरूर बाजार समितीचे माजी सभापती व संस्थेचे सचिव प्रकाश बापू पवार यांनी व्यक्त केले.

जातेगाव बु (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयात साक्षी गायकवाड हिचा सन्मान सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी हिवरे गावचे माजी सरपंच विकासनाना गायकवाड, शारदा गायकवाड, जातेगाव बु चे. विद्यमान सरपंच गणेश अण्णा उमाप, माजी सरपंच किशोर खळदकर, सामाजिक कार्यकर्ते बंडू नाना क्षिरसागर साक्षी गायकवाड व प्राचार्य रामदास थिटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामदास थिटे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश बांगर यांनी केले तर आभार प्राध्यापक संतोष डफळ यांनी मानले.

संस्था अध्यक्ष सुगंधराव उमाप व राज्य उत्पादन शुल्क माजी आयुक्त व उपाध्यक्ष कांतीलाल उमाप यांनी सदर उपक्रमाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.