शिरूरः शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगाडवाडी येथे नवीन शाळेच्या मैदानात ‘एक मूल दोन झाडे’ हा उपक्रम राबवून वृक्षारोपण करण्यात आले होते. झाडांवरील उत्कट प्रेमापोटी आज शालेय विध्यार्थिनींनी चक्क झाडांची पूजा करून अनोखे रक्षाबंधन केले व आपण लावलेल्या झाडाचे संवर्धन करण्याची शपथ घेतली.
मुलांनी स्वमेहनतीने शाळेत परसबाग तयार केली आहे. बागेत रोजच्या पोषण आहारासाठी मिरची, टोमॅटो, वांगी भोपळा कोथंबीर कढीपत्ता या उपयोगी रोपांची लागवड केली आहे. मुलांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल दशरथ चोरामले, उपाध्यक्ष सुरेश महादू गोरड यांनी शाळेतील सर्व मुलांना अकरा हजार रुपये किंमतीचे स्पोर्ट्स ड्रेस भेट म्हणून दिले. शाळेचे मुख्याध्यापक अशोक पवार व सूर्यकांत बढे गुरुजी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड…
निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा!
मुंबई: शिरुरचे आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु…
शिरुर तालुक्यातील गुनाट येथे सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला ध्वजारोहणचा मान