शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे कार्यरत असताना काळे तलाठी याला आठ वर्षापुर्वी एका शेतकऱ्याकडून नोंदीचे पैसे घेताना लाललुचपत विभागाने पाठलाग करून रंगेहात पकडले होते.
सस्पेन्ड झाल्यानंतर पुणे येथे नोकरी करुन पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी शिरूर तालुक्यात प्रवेश करून नोंदीसाठी नावाप्रमाणेच ‘विशाल’ पैसे कमवण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी ज्या तालुक्यात नोकरी करत असताना लाललुचपत विभागाची कारवाई झाली आहे तेथे नियुक्ती देण्यात येत नाही, असे परिपत्रक होते. याचा आधार घेत एका सामाजिक कार्यकर्त्याने याबाबत आंदोलन करून त्याच्यासहीत अनेक जणांची बदली पुणे येथील प्रांत कार्यालयात केली होती. परंतु वरीष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून मॅट मध्ये जात पुन्हा शिरूर येथे जैसे थे नियुक्ती मिळवली. या तलाठयाने आता हायवेच्या कडेला गुंठामंत्री असणाऱ्या कोरेगाव भीमा सजातील नागरिकांकडून नोंदीसाठी तो मोठी आर्थिक लुट करत आहे. गुंठ्यांच्या अनेक बेकायदेशीर नोंदी केल्याचे काळे कारनामे समोर येत असून त्याने अनेक नोंदी प्रलंबित ठेवल्या आहे.
सणसवाडी येथे सुद्धा याच पद्धतीने कामकाज केले जात असून नोंदीसाठी येणाऱ्या नागरीकांची मोठी लुट करत असल्याचे समोर येत आहे. त्यानेही अनेक गुंठेवारीच्या नोंदी केल्या असून असून जांबुत येथून उड्डाण करून थेट सणसवाडी गाठले. पैश्याच्या हव्यासापोटी या दोघांनी कहर माजवला असून, या दोंघाची वरीष्ठ आधिकाऱ्यांनी तातडीने दप्तर तपासणी करुन दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तातडीने कारवाई न झाल्यास अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
शिरूर तालुक्यातील ‘तलाठी, मंडल आधिकारी जोमात नागरीक कोमात’ अशी अवस्था…
शिरूर तालुक्यातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांकडून आर्थिक मलईसाठी नोंदी करण्यासाठी होतेय टाळाटाळ…
Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त…
शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले
जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…