zp school warude

विद्यार्थ्यांचे कल्याण यातच शिक्षकाचे समाधान: सुर्यकांत बढे

शिरूर तालुका

शिक्रापूरः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुडे येथील १९९९ सालची इयत्ता सातवी च्या बॅचचे रविवारी (ता. २१) तब्बल चोवीस वर्षांनी स्नेहसंमेलन संपंन्न झाले. यावेळी चोवीस वर्षापूर्वी एकत्र शिकलेली, खेळलेली सर्व मुले-मुली आपल्या मुलांसह एकत्र जमले होते.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जिवनातील आठवणींना यावेळी उजाळा दिला. सातवीपर्यंतचे वर्गशिक्षक सुर्यकांत बढे गुरुजी व आठवी ते दहावी चे वर्गशिक्षक श्री. औटी सर व श्री. साळुंके सर यांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. बढे गुरुजी यांनी सांगितले कि, ‘विद्यार्थ्यांचे कल्याण झाले तरच शिक्षकांना समाधान वाटते. शिक्षक निस्वार्थीपणे आपल्याकडे असलेले सर्व विद्यार्थ्यांना देत असतो. प्रत्येक विद्यार्थी आपल्या कुवतीप्रमाणे ते घेत असतो.’

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अर्चना तांबे, प्रदिप डांगे, अश्विनी शिंदे, गणेश काळे, गणेश भरणे, अनिल तांबे, उज्वला तांबे, लता शेवाळे, सलिम मुलाणी, रविंद्र डांगे, आक्का फंड, सुमित्रा शेवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश काळे यांनी तर अर्चना तांबे यांनी आभार मानले.