Sabalewadi

साबळेवाडीतील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण सुरू…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील साबळेवाडी गावठाण हद्दीत सुमारे सहा एकर जागेत गेली अनेक वर्षे अतिक्रमण झालेले असून ते काढण्यात यावे. या मागणीसाठी संतोष मोहन साबळे यांनी सोमवार (ता. ३) पासून टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

संतोष साबळे यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत टाकळी हाजी यांना याबाबत त्यांनी वेळोवेळी निवेदन देऊन अतिक्रमण काढण्याची मागणी गेली तीन वर्षांपासून ते करीत आहेत. त्यांच्या मागणीनुसार शिरूर भुमी अभिलेख कार्यालयाने या क्षेत्राची मोजणी केली आहे. त्यानुसार साबळेवाडी येथील गावठाण हददीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे सिद्ध झाले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. तसेच राजकीय वरदहस्तामुळे अतिक्रमण धारकाला पाठीशी घातले जात आहे. गावात अश्याच प्रकारे अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमणे करीत जागा लाटल्या असून, गावा बाहेरील लोकानीही येऊन अतिक्रमणे केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा पांठीबा मिळत आहे.

माजी सरपंच दामु आण्णाघोडे, पंचायन समिती सदस्या व विदयमान सरपंच अरुणाताई घोडे संचालक सावित्राशेठ थोरात, जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे, घोडगंगा सहकारी साखर कारखाण्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, भाऊसाहेब महाराज चोरे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संभाजी साबळे, बाबाजी रासकर, दत्तात्रय मुसळे, सोनभाऊ मुसळे, भिम आर्मी, गुरुकुल शिक्षक संघ, वारकरी मंडळ गावातील अनेक सामाजिक संस्था तसेच तरुण वर्गाने या उपोषणाला पांठीबा दिला आहे.