शिरुर पोलीस स्टेशनला आनंद नर्सरी आणि मातोश्री नर्सरीच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त भेट म्हणुन दिले वृक्ष 

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे: शिरुर येथील आनंद नर्सरी आणि मातोश्री नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर जयंतीनिमित्त शिरुर पोलीस स्टेशन येथे सुशोभीकरणासाठी जास्तीत जास्त शुद्ध ऑक्सिजन देणारी झाडे भेट देण्यात आली. परंतु पोलीस स्टेशनच्या आवारात झाडे लावण्यासाठी पुरेसी जागा उपलब्ध नसल्याने हि झाडे कुंडीमध्ये देण्यात आली. त्यामुळे पोलिस स्टेशनच्या आसपासच्या परिसराची शोभा वाढली आहे.

यावेळी आनंद नर्सरीच्या कामिनी बाफना आणि मातोश्री नर्सरीचे अमोल माळवदकर यांचा शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना कामिनी बाफना म्हणाल्या, शिरुर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेली महीला दक्षता समिती याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालु असुन त्यांच्या सहकार्याने नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे सर्व महिलांचा महीला दक्षता समितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला असल्याचे सांगितले.

यावेळी शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार, एकनाथ पाटील, गोपनीय पोलिस अंमलदार राजेंद्र गोपाळे, विशाल कोथळकर महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा राणी कर्डीले, उपाध्यक्षा शशिकला काळे, सामाजिक सुरक्षा कक्षाच्या शोभना पाचंगे, सदस्या राणी शिंदे, सरला फुंदे, भव्या बाफना, सपना बोरा, मनीषा नहार,माया गायकवाड, सौ दौंडकर, सौ गुंड आदी महीला उपस्थित होत्या. यावेळी पोलीस स्टेशनला झाडे भेट दिल्याबद्दल महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानले.