शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या राज्यात राजकीय समीकरणे बदलेली असताना शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झालेले असताना मी शिवसैनिक असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत एक निष्ठ आहे हे दाखवून देण्यासाठी साईराम कनकुंठवार हा शिवसैनिक नांदेड ते मातोश्री पायी प्रवास करत असून त्याचा शिक्रापूर येथे शिवसैनिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नुकतेच नांदेडहून पायी निघालेल्या साईराम कनकुंठवार या शिवसैनिकाचे आगमन झाले. यावेळी स्थानिक शिवसैनिकांकडून त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख अमोल हरगुडे, युवसेना तालुका प्रमुख विजय लोखंडे, विभागप्रमुख कौस्तुभ होळकर, नाना गिलबिले, उद्योजक प्रशांत सासवडे, प्रवीण गाडेकर, आदित्य गाडेकर, करण कसबे, सुजित विरोळे, आकाश सुर्वे, संतोष कांबळे, अभिषेक सुर्वे यांसह आदी उपस्थित होते.
तसेच सदर शिवसैनिकाचा वाजे उद्योग समूहाचे प्रमुख दादा वाजे यांच्या वतीने देखील शिक्रापूर चाकण रस्त्यावर सन्मान करण्यात आला, साईराम हा शिवसैनिक २३ ऑगस्ट रोजी पक्ष निष्ठतेचा संदेश देण्यासाठी निघाला आहे. दररोज ४० किलोमीटर प्रवास सदर युवक करत आहे. सध्याच्या प्रवासात अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून या तरुणाचे स्वागत होत आहे.
याबाबत बोलताना सध्या अनेक आमदार, खासदार, नगरसेवक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी पक्ष सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. मात्र आपण पक्षाशी एकनिष्ठ असून खरे शिवसैनिक उद्धव ठाकरे साहेबांसोबत असल्याचा संदेश आपण देत असल्याचे साईराम कनकुंठवार यांनी सांगितले.