Shirur Police Station

विहीरीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात महिला व मुलाच्या मृत्यूचे गुढ उकलले…

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथील येवले माथा जवळील एका शेतकऱ्याच्या विहीरीमध्ये एका अज्ञात महीलेचे व तिच्या मुलाचा ८ दिवसांपुर्वी मृतदेह आढळून आला होता. अद्यापपर्यंत विविध वृत्तपत्र, सोशल मिडीयाद्वारे फोटो सह प्रसिद्धी देवूनही या अज्ञात महिलेची व तिच्या मुलाची ओळख पटली नव्हती. शिरुर पोलिस स्टेशन पुढे हा खुन की आत्महत्या हे गुढ ऊकलणे व खरा आरोपी गजाआड करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

दरम्यान टाकळी हाजी चे सरपंच दामू आण्णा घोडे यांचा स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क असल्याने व त्यांनी या महिलेचे व तिच्या बालकाचे फोटो माहीतीसह स्टेटसला ठेवल्याने या घटनेची माहिती काही बाहेरगावातील कामगारांमार्फत सहाय्यक फौजदार नजिम पठाण यांना कळाली. नजीम पठाण यांनी तात्काळ जलद गतीने तपास यंत्रणा राबवून मृत महीलेचा पती योगेश संभाजी कुऱ्हाडे रा. पैठण जि. औरंगाबाद याला मलठण (ता. शिरुर) येथून फरार असताना ताब्यात घेतले असून त्याने खुण केलेला गुन्हा कबुल केला आहे. खरा आरोपी गजाआड केल्याने मृत माय लेकांना न्याय मिळणार आहे…

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नजीम पठाण यांचा कौशल्यपुर्ण तपास…..
शिरुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नजीम पठाण यांनी शिरुर पोलिस स्टेशनमधील अत्यंत क्लिष्ठ व खुनाच्या तसेच चोरीच्या गुन्हातील आरोपी गजाआड करण्यात यश मिळवले असताना पुन्हा एकदा या अज्ञात महिलेचा व तिच्या मुलाच्या खुनाचा छडा लावण्याचा चंग बांधून त्यांनी. उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षकअमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनिल ऊगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शोध मोहीम राबवत महिलेची व तिच्या मुलाची ओळख पटवत महीलेचा व तीच्या मुलाचा खुन करुन पसार झालेल्या आरोपीला गजाआड करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिरुर तालुक्यातील नागरीकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.