हिवरे कुंभार शाळेचे नऊ विद्यार्थी जिल्हा गुणवंत यादीत

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीचे तेवीस विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले असताना त्यापैकी बावीस विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून 9 विद्यार्थी जिल्हा गुणवत यादिमध्ये झळकले असल्याची माहिती मुख्याध्यापक शुकराज पंचरास यांनी दिली आहे.

हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीतील शिष्यवृत्ती परीक्षेत बावीस विद्यार्थी पात्र ठरले असून या विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वी मांदळे २७६ गुण, वेदिका तांबे २७६ गुण, सुयश फंड २६८ गुण, ओम साळुंके २६८ गुण, लोकेश भंडारी २६६ गुण, आदित्य जगताप २५२ गुण, श्रेयस साळुंके २४६ गुण, कार्तिकी शितोळे २४४ गुण, वेदिका थोरात २४२ गुण अशा प्रकारे गुण मिळवत 9 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवंत यादीत स्थान मिळवले आहे तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुनिल फंड व अंजली शिंदे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सरपंच शारदा गायकवाड, उपसरपंच दिपक खैरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अमोल जगताप, मुख्याध्यापक शुकराज पंचरास, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माणिकराव जगताप, उपाध्यक्ष राजश्री तांबे, माजी अध्यक्ष विठ्ठल जाधव, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांसह आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.